कायदा, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली

भिगवण- सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू असून आपल्या परिसरात शांततेचे वातावरण असून त्यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपण सज्ज रहावे, असे प्रतिपादन भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड यांनी केले.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी (दि. 9) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भिगवण पोलीस ठाण्याच्यावतीने बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी राठोड बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, उपसरपंच जयदीप जाधव, अजिंक्‍य माडगे यांच्यासह परिसरातील सरपंच व पोलीस पाटील आदी उपस्थित होते. नीळकंठ राठोड म्हणाले की, भिगवण शहरातील नागरिकांनी नेहमी कोणत्याही सामाजिक प्रश्‍नांवर सामंजस्याची भूमिका घेतली असून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने होत असताना कायदा सुव्यवस्था राखत मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. यापुढील काळातही सहकार्य अपेक्षित असून आपण देखील पोलीस ठाण्याच्यामाध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करु.
यावेळी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केल्याबद्दल जवानांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे तुषार झेंडे यांची राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल झेंडे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी रमेश जाधव,एम. जी. जगताप,राजकुमार मस्कर, नितीन चितळकर, पोलिस पाटील तनुजा कुताळ यांनी मनोगत व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)