कायदाविश्व: इकरार नोंद करतात?

तलाठी यांचेकडे सखारामने इकराराचा दस्त आणून दिला. तलाठी भाऊसाहेब अगदीच नवीन होते. त्यांना नेमके काय करायचे याचा बोध होत नव्हता.
मंडलअधिकारी आल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना इकरार नोंदींबाबत माहिती विचारली. मंडलअधिकारी यांनी तलाठी भाऊसाहेबांना माहिती दिली की, “इकरार’ या शब्दाचा अर्थ ‘करार करणे (Contracting)’, ‘घोषित करणे (Declare)’, ‘प्रतिबध्दता (Engagement)’ असा होतो.

एखादा खातेदार स्वत:च्या जमिनीवर एखाद्या विकास सोसायटीकडून किंवा सहकारी बॅंकेकडून, शेतीच्या विकासासाठी, जमीन तारण ठेऊन, कर्ज घेतो; म्हणजेच तो त्या विकास सोसायटी किंवा सहकारी बॅंकेसोबत शेतीच्या विकासासाठी कर्ज घेऊन परतफेडीचा करार करतो/परतफेड करण्याचे विकास सोसायटीला किंवा सहकारी बॅंकेला घोषित करतो/विकास सोसायटी किंवा सहकारी बॅंकेसोबत कर्जफेडीसाठी प्रतिबद्ध होतो यालाच “इकरार’ म्हणतात.

जेव्हा एखादा खातेदार एखाद्या विकास सोसायटीकडून किंवा सहकारी बॅंकेकडून शेतीच्या विकासासाठी कर्ज घेतो तेव्हा झालेला करार विकास सोसायटी किंवा सहकारी बॅंक तलाठी यांना कळवते. याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद करायची असते. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवायची असते.

मंडलअधिकारी यांनी नोंद प्रमाणित केल्या नंतर या “इकरार’ ची नोंद सात-बारा सदरी “इतर हक्कात’ नोंदवावी. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे जमीन गहाण ठेवली तरी जमिनीच्या मालकी हक्कात बदल होत नाही. त्यामुळे अशी नोंद कब्जेदार सदरी करता येत नाही.

तथापि, भारतीय रिझर्व बॅंकेचे परिपत्रक क्र. आरबीआय / 2011-12/ 553 आरपीसीडी – एफएसडी – बीसी नं. 77 / 05.05.09/ 2011-12, दिनांक 11 मे 2012 अन्वये रिझर्व बॅंकेने कृषी कर्जाबाबत सुधारीत योजना सुरू केली असून रक्कम रुपये एक लाख पर्यंतच्या कर्जासाठी जामीनाची (Security) आवश्‍यकता असणार नाही, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रक्कम रुपये एक लाख पर्यंतच्या कर्जाची नोंद सात-बाराच्या “इतर हक्का’त करण्याची आवश्‍यकता नाही.

(संदर्भ : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 149 व 150 ; शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबतचा अधिनियम 1884.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)