काम सुरू होण्यापूर्वी ‘बुलेट’ सुपरफास्ट; पूल, बोगद्यांचे डिझाईन तयार

मुंबई : बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुपरफास्ट सुरू असल्याचे दिसत आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील पूल आणि बोगद्यांचे ८० टक्के डिझाईन तयार झाले आहे. याची माहिती बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच भूसंपादन काम देखील हाती घेण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिन्जो आबें यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प होत आहे.

दरम्यान, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या रेल्वेमार्गावर प्रवास करण्यास ७ तास लागतात. मात्त्र बुलेट ट्रेनमुळे हा वेळ ३ तासांवर येणार आहे. या मार्गावर बीकेसी, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद अशी १२ स्थानके असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)