“कामे सुरू न केल्यास राष्ट्रवादीतर्फे आंदोलन’ 

कोपरगाव – कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक विविध कामांच्या निविदा एक वर्षापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत ही विकासकामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे तत्काळ सुरू करावीत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरपालिका गटनेते वीरेन बोरावके यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

बोरावके यांनी निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक कोपरगाव शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या बाबतीत नेहमीच आवाज उठवीत आहे. परंतु पालिका प्रशासन विकासकामांच्या बाबतीत खूपच उदासीन आहे. उदासीनतेचे उत्तम उदाहरण प्रभाग क्रमांक नऊमध्ये दिसत आहे.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील विविध कामांच्या निविदा काढल्या आहेत. मात्र वर्ष होऊनही ही कामे सुरू झालेली नाहीत. रस्त्याचे काम न झाल्याने लक्ष्मीनगर, साईनगर, धारणगाव रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याचे काम कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने सुरू करावे. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी विजयराव आढाव, नगरसेवक वीरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, ठकाजी लासुरे, जाधव बाबा, संतोष वढणे, तुषार पोटे, साजिद पठाण, बाळासाहेब दीक्षित, दिलीप आव्हाड, प्रकाश कदम, गजानन वाकचौरे, दीपक पंजाबी, विकास बेंद्रे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेने आपल्याला प्रभागातील प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र कामे होत नसल्याने आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे कोपरगावच्या विकासात आडकाठी आणणाऱ्यांना जनता योग्य वेळी जाब विचारणार आहे, असे बोरावके यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)