कामे पुर्ण करा मगच टोलवसुली करा – सदाशिव लोखंडे

संगमनेर – टोलनाक्यावर दादागिरी वाढली असून नियमाचे उल्लघंन करून टोलवसुली सुरू आहे. एम. एच. १७ पासिंगच्या सर्वच चारचाकी वाहनांना टोलमुक्ती करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. अपुर्ण कामे पुर्ण केल्यानंतर टोल शुल्क आकारावा. अन्यथा शिवसेना स्टालइने पुन्हा दोन दिवसानंतर आंदोलन केले जाईल. असा इशारा शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी टोल व्यवस्थापनास दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे डी. एस. झोडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेबनाना खेवरे, प्रातांधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, अप्पा केसेकर, अ‍ॅड. दिलीप साळगट, अमोल कवडे, अशोक सातपुते, भाऊसाहेब हासे, पप्पू कानकाटे, अमित चव्हाण, गुलाब भोसले, रमेश काळे, रामभाऊ राहाणे, एस. पी. राहाणे, शाम राहाणे आदि शिवसैनिक उपस्थित होते.

-Ads-

आज झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नसून दोन दिवसात टोलप्रशासनाने एम. एच. १७ पासिंगच्या सर्व वाहनांना टोल फ्री करावा तसे न झाल्यास शिवसेना स्टाईलने टोल मुक्तीसाठी आंदोलन केले जाईल.असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)