कामावर येत नाही म्हणून दुचाकी, मोबाईल हिसकावला

सणसवाडीत कामावर येताना घडला प्रकार : मारहाण, जीव मारण्याची धमकी

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे औद्योगिक वसाहतीत कामगारांना कामावर घेण्यासाठी नेहमी वेगवेगळ्याप्रकारे शक्‍कल लढविल्या जातात. परंतु कामगार कामावर जात नाही म्हणून त्याला कामावर जाण्याबाबत त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्याकडील दुचाकी व मोबाईल बळजबरीने काढून घेतला. सणसवाडी येथे हा प्रकार घडला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. याबाबत अमोल विश्वनाथ निघोट (रा. सणसवाडी, शांती हॉस्पिटलशेजारी ता. शिरूर, मूळ रा. निघोटवाडी, मंचर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली
सणसवाडी येथील कामगार अमोल निघोट याच्याकडे कंपनीतील फोरक्‍लिप चालविण्याबाबतचा परवाना आहे. हा परवाना त्या कामासाठी वापरून एका कंपनीत नोकरी करतो. दि. 13 नोव्हेंबर रोजी निघोट हा त्याच्या ओळखीच्या हिरामण दरेकर यांच्याकडे फोरक्‍लिप चालविण्यासाठी कामाला गेला होता. परंतु तेथील काम त्याला न आवडल्यामुळे तो घरी आला. दुसऱ्या दिवशीपासून कामावर जाणे बंद केले. त्यांनतर या कामाचे ठेकेदार हिरामण दरेकर यांनी त्याला फोन करून कामावर जाण्याबाबत विचारले असता अमोल याने नकार दिला. त्यानंतर दरेकर यांनी दि. 16 नोव्हेंबर रोजी अमोल याला सणसवाडी चौकात बोलाविले. त्यांनतर सायंकाळी दरेकर हे त्यांच्या ताब्यातील एमएच 12- 6070 या क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून आले. त्यांनी अमोल याला “तू कामावर का गेला नाही’ असे म्हणून हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. “आता तू सणसवाडीत परत दिसला तर तर तुझे हातपाय तोडीन, अशी धमकी दिली. कामगार अमोल निघोट याच्याजवळील दुचाकी व मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर दरेकर हे निघून गेले. अमोल निघोट याने वारंवार स्वतः तसेच इतरांच्यामार्फत फोन करून त्याची दुचाकी व मोबाईल देण्याची विनंती केली. परंतु दरेकर यांनी मोबाईल व दुचाकी दिली नाही. त्यांनतर या कामगाराचा फोन उचलणे बंद केले. शिक्रापूर पोलिसांनी हिरामण शिवाजी दरेकर (रा. सणसवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)