कामावर मृत्यू झाल्यास दहा लाखांचे सानुग्रह अनुदान

मुंबई – राज्य सरकारी कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे तसेच कृषी विद्यापीठे येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू असणार आहे.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना 2015 पासून लागू झाली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात झालेल्या अंशदानावर सरकार तितकेच अंशदान देत असते. कर्मचाऱ्यांच्या योजनेचे सदस्यत्व, मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणामुळे सेवा संपुष्टात आल्यास त्या रकमेवर वार्षिक लाभ मिळतो. मात्र कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास सद्यस्थितीत कोणतीही वार्षिक योजना कार्यान्वित नसल्याने कर्मचाऱ्यास त्याच्या खात्यावर जमा झालेला सर्व संचित निधी मिळतो. या योजनेत कर्मचारी सेवेत असताना अल्प कालावधीतच मृत्यू पावल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांस त्याच्या खाती जमा असणाऱ्या संचित निधी व्यतिरिक्‍त इतर कोणतेही लाभ मिळत नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हीच बाब लक्षात घेउन 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्य सरकारी सेवेत नियुक्‍त झालेला कर्मचारी जर 10 वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये सानुग्रह अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्‍त कर्मचाऱ्याचा संचित निधीची रक्‍कम देखील कुटुंबियांना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)