कामाच्या “प्रेशर’ने कर्मचाऱ्यांना “ब्लडप्रेशर’

वाघोली- वाघोलीत 43 हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. मीटर जोडणी, बिल वसुली, बिल दुरुस्ती, वीज चोरी, ग्राहकांच्या तक्रारी आदि विविध कामे हाताळावी लागतात. यातून काम वेळेत होत नसल्याने ग्राहक वरिष्ठांना तक्रार करीत असल्याने कामाच्या ताणातून अधिकारी व कर्मचारी यांच्यात तु-तु, मैं-मैं वाढली आहे. याच कारणातून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सध्या डायबेटीस, ब्लडप्रेशर आदि आजारांनी त्रस्त आहेत. ग्राहक, वरिष्ठ अधिकारी आणि काम असा समतोल राखताना अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत आहे.
वाघोली येथील एकाच सहाय्यक अभियंता कार्यालयामार्फत 43 हजारांपेक्षा अधिक ग्राहकांचा कारभार चालत असून वाढत्या नागरीकरणामुळे प्रत्येक महिन्याला एक हजार नवे मीटरची मागणी होत असल्याने ग्राहकांना दर्जेदार व वेळेत सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. वाढती ग्राहकांची संख्या लक्षात घेता कर्मचारी वाढवण्याची मागणी ग्राहकांतून होवू लागली आहे. वाघोली येथे महावितरण विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता कार्यालय असून एक सहाय्यक अभियंता व 14 कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. हडपसर ग्रामीण उपविभागीय कार्यालयांतर्गत वाघोली, पेरणे, फुरसुंगी आणि उरुळी देवाची अशी चार शाखा कार्यालये असून यामध्ये शाखा-2चे कार्यालय वाघोली येथे आहे.
दरम्यान, आमदार बाबुराव पाचर्णे यांनी महावितरण विद्युत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व ग्राहक यांची गेली पंधरा दिवसापूर्वी बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी दि. 1 एप्रिल पासून वाघोली येथे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती महावितरण पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी बैठकी दरम्यान दिली होती. उपविभागीय कार्यालय झाल्यास येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताण कमी होणार असल्याने या कार्यालयाचे काम तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.

  • वीज बिल वेळेत भरा…
    विद्युत कंपनीने तत्पर आणि चांगली सेवा द्यावी, अशी ग्राहकांची अपेक्षा असते, तशीच विद्युत कंपनीची सुद्धा ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरावे अशी अपेक्षा आहे. यामुळे केवळ विद्युत कंपनीचे अधिकारी, कर्मचारीच दोषी आहेत, असे नाही तर ग्राहकही तेवढेच जबाबदार आहेत. 43 हजारांपेक्षा अधिक ग्राहकांची संख्येपैकी 50 ते 60 टक्के ग्राहकांनी अद्यापही संपुर्ण वीज बिल भरलेले नाही. महावितरणकडून सहकार्याची भावना ठेवताना ग्राहकांनीही वीज बिल वेळेत भरावीत, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
  • ग्राहकांनी कुठल्याही एजन्सीला न भेटता प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क करावा त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लुट होणार नाही. ग्राहकांना वेळेत व चांगली सेवा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे वेळेत काम मार्गी लावणे कधी कधी शक्‍य होत नाही. वाढत्या ग्राहक संख्येमुळे प्रचंड ताण येतो. ग्राहकांकडून सुद्धा सहकार्य असणे गरजेचे आहे
    – नंदराम वैरागर, सहाय्यक अभियंता, वाघोली

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)