कामाचे पैसे मागितल्याने एकाला मारहाण

सातारा- अपघात झालेल्या गाडीचे काम केले, त्याचे पैसे मागितले म्हणून एकाला मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली. याप्रकरणी महेंद्र वसंतराव भोईटे रा. म्हाडा कॉलनी,सातारा. यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पंकज बडदरे रा.करंजे,सातारा याच्या गाडीचा काही दिवसापुर्वी अपघात झाला होता. त्या गाडीच्या दुरूस्तीचे काम महेंद्र यांनी त्यांच्या वाढे फाटा येथील गॅरेजला केले होते. त्याचे पैसे वेळोवेळी मागूनही पंकज देत नव्हता. त्यामुळे तक्रारदार हे त्याच्या घरी पैसे मागण्यास गेले होते. त्यावेळी पंकज याचे वडीलांनी(पुर्ण नाव माहित नाही) महेंद्र यांना कसले पैसे मागतो. असे म्हणत चप्पलने मारहाण केली. अशी तक्रार महेंद्र भोईटे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)