कामशेत येथे स्कूल बस रेल्वे फाटकावर आदळली

फाटक नादुरुस्त : बसचालकावर गुन्हा दाखल

कामशेत – मध्य रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवर कामशेत शहरातील गेट नं. 43 वर सोमवारी (दि. 1) रोजी सकाळी 7.40 मिनिटांच्या सुमारास एका स्कूल बसची धडक बसून डाउन ट्रॅक वरील रेल्वे गेट तुटले. त्यामुळे रेल्वे गेटवर दोन्ही बाजुने वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

रेल्वे पोलिसांनी व गेट मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.40 च्या सुमारास पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल (क्र. एल. 89908) गेट बंद करीत असताना अचानक भरधाव वेगात आलेली स्कूल बस (क्र एम. एच. 04 जी. 9013) या गाडीने धडक दिल्याने डाउन ट्रॅकवरील रेल्वे गेट तुटला. या प्रकरणी चालक अंकुश लक्ष्मण गायकवाड (वय 37, रा. कांबरे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाटक वाकल्यामुळे रेल्वे काहीकाळ उशिराने धावत होत्या. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे अविनाश पडवकर व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तळेगाववरून नवीन लोखंडी गेट आणून तातडीने बसविण्यात आले. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या वेळी सकाळची वेळ असल्यामुळे नाणे मावळातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या विद्यार्थी, कामगारवर्ग, दुग्ध व्यवसायिक यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. या प्रकरणी रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कुजूर तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)