कामशेत येथे शाळकरी मुलांची वृक्षदिंडीतून पर्यावरणविषयक जनजागृती

वडगाव मावळ – कामशेत येथील आनंदराम पन्नालाल भटेवरा, जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. 28) रोजी येथील पंडित नेहरू विद्यालय ते शिवाजी चौकापर्यंत वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती केली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील विविध संतांची वेषभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी या वृक्षदिंडीत पर्यावरण, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती व शिक्षण आदी विषयी जनजागृती घोषणा दिल्या. झाडे लावा झाडे जगवा, त्यांचे संवर्धन व संरक्षण करा. प्लास्टिक वापर टाळा, कचऱ्याचे व्यवस्थापन करा आदी घोषणांचे फलक विद्यार्थ्यांनी घेऊन वृक्षदिंडी काढली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री शुक्‍ला यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी वृक्षदिंडीचे नियोजन केले. या वृक्षदिंडीत बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)