कामशेत येथे गो-सेवा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता

नाणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामशेत शाखेच्या पुढाकारातून दोन दिवसीय गो-सेवा कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप रविवारी (दि. 7) नायगवच्या साई सेवाधाम येथे झाला.

प्रशिक्षणच्या दुसऱ्या दिवशी गो-सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना व शेतकरी बांधवाना गो-मातेचे विविध फायदे सांगण्यात आले. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी व त्याचे फायदे सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या आजारांवर घरगुती उपाय योजना, शेती व जनावरांच्या विविध आजार-रोगांवर घरगुती व स्वस्त उपाय करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. देशी गायी या जिवंतपणी तिच्या प्रत्येक घटकातून फायदा मिळवून देतेच; परंतु तिच्या मृत्यू नंतरही ठराविक प्रक्रियेतून जीवाश्‍म खताचीही निर्मिती करता येते, अशी माहिती अखिल भारतीय गोसेवा समितीचे अध्यक्ष शंकर लालजी यांनी दिली.

-Ads-

गो-मातेचे गोमूत्र, शेण यांपासून गोअर्क व गोबरगॅस कसा तयार करण्यात येतो. याविषयीचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. गो-मातेच्या याविविध फायद्याची माहिती समाजाच्या उन्नतीसाठी सर्वत्र पोहचवून गोवंश टिकवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण देशात गो-सेवा चळवळ निर्माण करण्यासाठी तात्या मगर व सुरेश घाडगे या गो-सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात गो-सेवा कार्यकर्ता प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर धर्माधिकारी यांनी दिली.

या वेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम शिंदे, अनंत चंद्रचूड, देवराईचे संस्थापक सुकन बाफना आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र रबडे यांनी केले. तालुका गो-सेवा समितीचे अध्यक्ष विक्रम बाफना, शंकर शिंदे, शंकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन शिंदे, युवराज शिंदे, प्रसाद उंडे, निखिल वाबळे, धनंजय पिंगळे, आनंद शिंदे, विक्रम वाळूंज आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)