नाणे-मावळ – कामशेत-पवनानगरला जोडणाऱ्या बौर घाटात खिंड आहे. खिंडीच्या दुतर्फा कड्यावर रानझाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुसळधार पावसामुळे झाडांची मुळे उघडी पडली असून त्यामुळे ही झाडे उन्मळून पडण्याची शक्‍यता आहे. ही खिंड अरुंद झाली आहे. खिंडीच्या कड्यावर असलेली ही झाडे जमिनीचा आधार नसल्याने रस्त्याच्या दिशेने खाली झुकलेली आहेत. ही झाडे रस्त्यावर कोसळून अपघात होण्याची शक्‍यता आहे. धोका ओळखून वेळीच यावर काही उपाय-योजना करावी, अशी मागणी मावळवासी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)