कामशेत पोलीस ठाण्यातील दूरध्वनी बंद 

कामशेत – कामशेत पोलीस ठाण्यातील दूरध्वनी मागील 15 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधने कठीण झाले आहे. पोलीस ठाण्यातील दूरध्वनी बंद झाल्याने नागरिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल 24 तास खणखणू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मागील पंधरा दिवसांपासून कामशेतमधील नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. पोलीस ठाण्यासारख्या महत्वाच्या कार्यालयातील फोन बंद झाल्याने परिसरात रात्री-अपरात्री कोणतीही आपत्कालीन घटना, अपघात आदी घटना घडल्यास त्याची तत्काळ माहिती पोलिसांना देऊन मदत मिळविणे अवघड झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे वैयक्‍तिक मोबाईलचे क्रमांक सर्वांकडे नाहीत. ज्यांचे क्रमांक आहेत ते दरवेळी पोलीस ठाण्यात असतीलच, असे नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस ठाण्यातील दूरध्वनी क्रमांक का बंद झाला आहे, याची माहिती बीएसएनएल कर्मचाऱ्यांना विचारली असता, मागील अनेक दिवसांपासून बीएसएनएलने महावितरण कंपनीचे बिल थकविल्यामुळे बीएसएनएलच्या यंत्रांचा विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने कामशेतमधील सर्वच दूरध्वनी बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

“बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांना थकीत वीजबिल भरण्यासाठी वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी वेळेत वीजबिल भरला नसल्याने त्यांना वीजबिल भरण्यासाठी आम्ही मुदतवाढ दिली होती; मात्र या वाढीव मुदत वाढीच्या काळात देखील वीजबिल न भरल्याने त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
– विनोद राणे, उपशाखा अभियंता, महावितरण, कामशेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)