कामशेत पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकपदी नीलकंठ जगताप

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍याची मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ राजाराम जगताप यांची नियुक्‍ती करण्यात आली. त्यांनी बुधवारी (दि. 27) पदाचा कार्यभार स्वीकारला.
कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक आय. एस. पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यक्षम सहाय्यक निरीक्षक नीलकंठ राजाराम जगताप यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी त्यांची कामशेत पोलीस स्टेशनच्या सहाय्यक निरीक्षक पदी नियुक्ती केली.

सहाय्यक निरीक्षक जगताप यांनी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असताना, अनेक गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवणारा कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेले खमक्‍या अधिकारी पोलीस स्टेशनला नियुक्‍त झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सहाय्यक निरीक्षक जगताप म्हणाले की, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच कामशेत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणार आहे. हद्दीतील अवैध धंदे चालकांवर कडक कारवाई केली जाईल. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी ठेचून काढू. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात निर्भया पथक नियुक्‍त करून विद्यार्थिनीमध्ये निर्भीड व सुरक्षितपणा निर्माण करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)