कामशेत परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाणे मावळ – कामशेत शहराच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भटक्‍या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. शहरात प्रवेश करताना महामार्गावर कचऱ्याचा मोठा ढिगारा कायम असल्याने तिथे कुत्र्यांचा वावर असतो. येथे 20-25 कुत्र्यांची टोळी सतत असल्याचे चित्र कायमच दिसते. या टोळ्या बऱ्याच वेळा नागरिकांवर जीवघेणा हल्ला करण्याचे प्रसंग घडतात. रात्रीच्या वेळी तर कामगार लोकांना जीव मुठीत धरून ठेवण्याची परिस्थिती निर्माण होते.

या कुत्र्यांची संख्या भयंकर वाढली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकामधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या मोटारीतून ही कुत्री ग्रामीण भागात सोडले जातात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. महामार्गाच्या ठिकाणी सोडली जाणारी ही कुत्री टोळीने मोकळ्या जागेने थेट रेल्वे मार्ग ओलांडून माऊलीनगरमध्ये प्रवेश करतात. यामध्ये बऱ्याचदा रेल्वे मार्गावर अनेक कुत्री अपघातात मरण पावलेल्या अवस्थेत दिसतात. त्यामुळे पुन्हा दुर्गंधी व रोगराईचा सामना करावा लागत आहे. अपघातातून वाचलेली कुत्री मोकाट फिरत असताना नागरिकांच्या थेट घरात शिरण्याचे प्रकार घडतात.

गेल्या मागील आठवड्यात एक कुत्रे गोदामातून नकळत शिरले. गोडाऊन बंद करण्यात आल्यानंतर सुमारे पाच दिवस उघडलेच गेले नाही. परिणामी त्या कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा तोच त्रास झाला. म्हणजेच दुर्गंधी व नंतर रोगराई. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रसाद कुटे, धनंजय कोंढरे, संतोष शिंदे, संतोष कदम, उमेश शेलार, सचिन पिंगळे, अशोक वाडेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

या भटक्‍या कुत्र्यांचा त्रास आता कामशेत शहरापुरता मर्यादित राहिला नसून, नाणे मावळातील नाणे, कांबरे व नवीन उकसान या गावातही मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)