कामशेत जवळ रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

कामशेत- रेल्वेच्या धडकेने एका 35 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कामशेत गावाच्या हद्दीत घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान घडला.

आप्पासाहेब चुणीलाल वाघ (वय 35, रा. देहुगाव, गाथा मंदिराच्या जवळ) असे या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. 28 रोजी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान खामशेत गावच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून आप्पासाहेब चुणीलाल वाघ यांचा मृत्यू झाला असल्याची खबर सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार लोणावळा लोहमार्ग पोलीस हवालदार सुहास जाधव हे घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला आहे. लोहमार्ग पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)