कामशेतमध्ये श्री बाबा रामदेव महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

नाणे-मावळ – राजस्थानी समाजाचे श्रद्धास्थान श्री बाबा रामदेव महाराज यांचा जन्मोत्सव कामशेत येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. भाविकांनी श्री बाबा रामदेव महाराज यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढली. महिलांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती. गणेश मंगल कार्यालयात सायंकाळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. बाबूलाल प्रजापत व प्रेमकुमार चौहान यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नरेश प्रजापत आणि पार्टी यांचा संगीत भजन संध्या, डी. एच. पुरी जग्गीया व कॉमेडी कलाकार पिंट्या यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.

मावळचे आमदार बाळा भेगडे, तळेगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील अण्णा शेळके, कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलकंठ जगताप, संचालक माऊली शिंदे, उद्योजक सुनिल भटेवरा, गणपत नेवाळे यांनी राजस्थानी बांधवांना उत्सवानिमित्त यावेळी शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशाल कुमावत यांनी सूत्रसंचालन केले. घेवरचंद रुपावत, मुरली शर्मा, विरजी महाराज यांनी महाप्रसाद दिला. सेवा समितीचे लक्ष्मण परिहार यांनी स्वागत केले. अध्यक्ष बाबूलाल प्रजापत,उपाध्यक्ष मदनसिंह परिहार, घेवरचंद रुपावत, बिजलाराम देवासी, सुनिल राजपुरोहित, रामलाल चौधरी, प्रेमकुमार चौहान, विजुजी पुरोहित, दिलखुश प्रजापत यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)