कामशेतमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह मार्गदर्शक फलकाद्वारे वाहनचालकांमध्ये जनजागृती

कामशेत – येथे 29 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त “सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ हे ब्रीद वाक्‍य घेऊन कामशेत पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा पुणे ग्रामीण यांचे वतीने 23 एप्रिल ते 5 मे या कालावधीत वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत कामशेत येथे पुणे-मुंबई महामार्ग 4 वर, पवनानगर रोड, कामशेत खिंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक व सहारा कॉलनी येथे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबतचे मार्गदर्शक फलक लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली आहे.

सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहन चालकांशी झालेल्या संवादामध्ये महामार्गावर व रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी व तपास कार्यास सहकार्य करण्याचे आवाहन कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी केले. कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हनुमंत माने यांनी व सहायक फौजदार दत्तात्रय खंडागळे, पोलीस हवालदार खंडू ताठीले, ओव्हाळ, चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या वेळी अनेक वाहनांवर रस्ते सुरक्षा सप्ताहाचे स्टिकर चिटकवण्यात आले. तसेच वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत कामशेतमधील मुख्य रस्त्यावर माहिती पत्रके वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)