कामशेतमध्ये युवकाची आत्महत्या

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत येथील युवकाने राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. कामशेत येथे शुक्रवार दि. 11 ला सकाळी दहा वाजता ही घटना घडली. अजय फुलचंद गायकवाड (वय 22, रा. देवराम कॉलनी, कामशेत) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

अजय गायकवाड देवराम कॉलनीत राहत होता. त्याच्या आत्महतेचे कारण समजू शकले नाही. प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने चिडलेल्या अजय याने आज सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली, अशी चर्चा आहे, अशी माहिती पोलीस मोहन वाघवले यांनी दिली.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी मच्छिंद्र मास्ते तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)