कामशेतमध्ये प्लॅस्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी सुरु

नाणे मावळ – कामशेत परिसरात प्लॅस्टिक बंदीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली.या कायद्यानुसार ग्रामपंचायत परिसरात प्लास्टिक निर्मिती करणे, प्लास्टिक विक्री करणे व प्लास्टिक वापर करणे यासाठी दंडात्मक कारवाई व शिक्षा करण्यात येणार आहे. याची कल्पना कामशेतच्या ग्रामपंचायतच्या वतीने शहरात पोस्टर लावुन देण्यात आली आहे.

त्यानुसार एका व्यक्तीने एकदा, दोनदा व तीनदा नियम मोडल्यास अनुक्रमे पाच,दहा व पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा नियम मोडल्यास प्रसंगी तुरुंगवासची शिक्षा भोगावी लागू शकते. शहराची कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. परिणामी अनेक समस्या भेडसावत होत्या. यावर उपाय म्हणून प्लास्टिक टाळा पर्यावरण सांभाळा ,अशी हाक ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.

प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने कचऱ्याची व पर्यायाने आरोग्याची, रोगराईची समस्या यात वाढ होत आहे. प्रदूषण नियंत्रणसाठी प्लास्टिक बंदी ही काळाची गरज आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
                                गजानन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, कामशेत

31 ऑगस्टपर्यंत नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवून व प्लास्टिकबंदी बाबत जनजागृती करून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाला कामशेतच्या सर्व नागरिकांचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
                                              नितिन गायखे, उपसरपंच कामशेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)