कामशेतमधून कारची चोरी

कामशेत – रस्त्याच्या बाजूला लावलेली कारच चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 19) पहाटे कामशेतमध्ये उघडकीस आला.

संजय चंद्रकांत शिंदे (वय-30, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांना कामशेतहून पुण्याला काही कामानिमित्त जायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली आय-20 ही कार (एमएच 12, एलजे 7050) कामशेतमधील मावळ ऑटो गॅरेजजवळ पार्क केली. बुधवारी सायंकाळी ते पुण्याला गेले. आपले काम आटोपून ते गुरुवारी पहाटे पुन्हा कामशेत येथे आले. तेथे पार्क केलेल्या जागी कार नव्हती. त्यानंतर शिंदे यांनी पोलिसांकडे धाव घेत कार चोरीला गेल्याची तक्रार दिली. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)