कामगार स्वतःच घेतात आरोग्याची काळजी

निगडी – सध्या शहरात कित्येक आजारांनी डोके वर काढले आहे. डेंगू आणि स्वाईन फ्लूने घातक ठरत आहेत. एमआयडीसी औद्योगीक परिसरामध्ये देखील आजारांची भिती आहे. सर्वांचे आरोग्य व्यवस्थीत राहावे, यासाठी एमआयडीसीतील कंपनींमध्ये कामगार आणि व्यवस्थापन आरोग्यासाठी स्वतःच स्वच्छता, औषध फवारणी करतात.
शहरात आजारांनी थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये कित्येक रुग्णांचा आजाराने बळी गेला आहे. औद्योगीक क्षेत्रातील वातावरण, पाणी या सर्व बाबीतून कंपनीं आता व्यवस्थापन आणि कामगारांनी आजारांनाच प्रतिबंध करेल, असे प्रयत्न सुरू केले आहेत. भोसरी येथील डायनोमर्क कंपनी आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबते. तसेच आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय यावर जनजागृती करीत आहे. यासाठी कंपनी मार्गदर्शन करते. गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की, कंपनी कामगारांची काळजी घेत असल्याने कामगार देखील आपला उद्योग समजून काम करतात.
वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख विशेष पुढाकार घेतात. डायनोमर्क कंपनीमध्ये विभाग प्रमुख हेमंत नेमाडे, अक्षरा राऊत, मोहन कृष्णन, हर्षल शेळके, पंडित वनस्कर, रवी भेंकी, रुपेश काकडे, राहुल शेंडगे, प्रिया देशमुख फवारणीसाठी सहकार्य करतात.

‘सध्या वातावरण आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. कामगार वर्ग कष्ट करत असतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यामुळे आजारांबाबत कंपनीत जनजागृती केली जात आहे. तसेच वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत.’
सुर्यकांत मुळे, विभाग प्रमुख मनुष्यबळ, डायनोमर्क.

‘मी देखील कामगारच होतो. कामगारातून कंपनी मालक झालो. यामुळे कामगारांच्या समस्या ठाऊक आहेत. आम्ही नेहमी कामगारांच्या हितासाठी प्रयत्न करतो. उद्योगाचे खरे मालक हे कामगारच असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे.’
किशोर राऊत, व्यवस्थापकीय संचालक, डायनोमर्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)