कामगार संघटना कृती समितीची द्वारसभा

पिंपरी – कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या येत्या 8 व 9 जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपात शहरातील कामगारांनी सहभागी व्हावे, याकरिता समितीच्या वतीने शहरातल कामगारांशी संवाद साधला जात आहे. त्याकरिता शहरात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पिंपरीतील हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्‍स आणि चिंचवड येथील प्रिमिअर ऑटो या दोन ठिकाणी द्वारसभा घेण्यात आल्या.

याप्रसंगी कामगार नेते कैलास कदम, व्ही. व्ही. कदम, ऍड. म. वी. अकोलकर, सुनील पाटसकर, अरुण बोऱ्हाडे, मनोहर गाडेकर, दिलीप पवार, अनिल आवटी, अनिल रोहम, मोहन पोटे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले
यावेळी कैलास कदम म्हणाले की, कामगारांचे आर्थिक, सामाजिक शोषण करीत भांडवलदारांना मोदी सरकार मदत करीत आहे. कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणूकीत सत्तेतून घालविले पाहिजे. त्यासाठी देशभरातील कोट्यावधी कामगारांनी 8 व 9 जानेवारी 2019 ला पुकारण्यात आलेल्या अखिल भारतीय संपात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी ऍड. म. वी. अकोलकर म्हणाले की, केंद्र सरकार सार्वजनिक बॅंका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे यांसह संरक्षण क्षेत्रात देखील खाजगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे. हे खाजगीकरण जनविरोधी व सर्व समाजाची सामाजिक सुरक्षा धोक्‍यात आणणारे आहे.

या संपात इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, बॅंक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राज्य सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी (नर्सेस व इतर), अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पथारी, फेरीवाले, बांधकाम, घर कामगार क्षेत्रातील संघटीत, असंघटीत सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)