चिंचवड – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने चिंचवड येथील कामगार कल्याण केंद्रात कामगार व कामगार कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन समाजसेविका शारदा मुंडे व गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे यांच्या हस्ते झाले. डॉ. किरण जोशी, डॉ. पायल ठोंगे, डॉ. निखील राक्षे, डॉ. कोमल कदम, डॉ. नीरजकुमार पाटील आदी उपस्थित होते. 110 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. किरण जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुभाष चव्हाण, सुदाम शिंदे, सोमनाथ पतंगे, शंकर पाटील विनोद सुर्वे, मच्छिंद्र कदम, संदीप रांगोळे, शिवाजी पाटील, जयेंद्र मुजुमकर, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते. रुपाली मुळीक, माया कदम, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांनी संयोजन केले. बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)