कामगार उपायुक्‍तालयावर गुरुवारी मोर्चा

पिंपरी – बांधकाम मजुरांसाठी सरकारने इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळ स्थापन केलेल्या मंडळात सात हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. साईटवरील मजुरांना सुरक्षा साधने व माध्यान्ह भोजन पुरविण्यासाठी काढलेली एक हजार कोटींची निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या गुरुवारी (दि.13) कामगार आयुक्‍त कार्यालयावर कष्टकरी कामगार पंचायत वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मंडळाकडे सात हजार कोटींची मोठी रक्कम विनावापर पडून आहे. पैशाचा उपयोग बांधकाम मजुराच्या कल्याणकारी योजनांसाठी करण्याऐवजी राज्य सरकारने कामगार खात्याअंतर्गत एक हजार कोटींच्या निविदा काढल्या असून यात कामगारांना सेफ्टी साधन पुरविणे, मध्यान्ह भोजन देणे आदी योजनांचा सहभाग आहे, सेफ्टी साधन पुरविणे हि बिल्डरची जबाबदारी आहे आणि आता त्यांच्याकडून ही साधने पुरविली जातात. मजुरांना साईटवर जाऊन मध्यान्ह भोजन कसे आणि कोठे देणार हे शक्‍य नाही यामुळे एक हजार कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात जाणार आहे. त्यामुळे या निविदा रद्द करून बांधकाम मजुराच्या खात्यावर हे पैसे जमा करावेत अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत वतीने अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.

-Ads-

नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना अवजारे खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप मंडळाच्या वतीने सुरु आहे, यासाठी मंडळाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले. दिवाळीपूर्वी सर्व मजुरांच्या बॅंक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्ष मात्र दिवाळी संपली तरी मजुरांना पाच हजार रुपये मिळाले नाही. सध्या अमलात असलेल्या योजना बांधकाम मजुरांपर्यंत पोहचत नाही मग एक हजार कोटींची निविदा कशासाठी आणि कोणासाठी काढली जात आहे.असा सवाल करत हि निविदा रद्द करा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली आहे.
पुणे येथील कामगार कार्यालयावर दुरुवारी (दि. 13) सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पिंपरी येथून मोर्चास सुरवात करण्यात येणार आहे. टप्याटप्याने महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येणार आहे. बांधकाम मजुरांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)