कामगाराला लूटणारे चौघे जेरबंद

भवानीनगर- बारामती येथील एमआयडीसी पियाजो कंपनीच्या पुढे रोडच्या कडेला थांबलेल्या कामगारास एका दुचाकीवरील चार मुलांनी तोंड दाबून उचलून अंधारात ओढत नेले. त्यास मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल व रोख रक्‍कम, असा 10 हजार 540 रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी चार चोरट्यांना अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे शोध पथकाने अटक केली. ओमप्रकाश लालासाहेब येळे(वय 19), असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती की, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एमआयडीसीमधील असलेल्या पियाजो कंपनीच्यासमोर रस्त्याच्या कडेला ओमप्रकाश येळे थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार मुलांनी येळे याचे तोंड दाबून उचलून अंधारात नेले. तिथे या चौघांनी त्याला मारहाण केली. तसेच येळे याच्याकडील एक मोबाईल व रोख रक्‍कम असा 10 हजार 540 रुपयांचा ऐवज पळविला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथक अप्पर पोलीस अधीक्षक बारामती पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस स्वप्नील अहिवळे, सुहास देवकाते, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे यांनी पेट्रोलिंग करताना माहिती घेतली. त्यात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील आरोपी कृष्णा धोत्रे (रा. बयाजीनगर, घाडगे वस्ती, एमआयडीसी बारामती) याने त्याच्या साथीदारामार्फत ही चोरी केलेली आहे. तो एमआयडीसी येथील पोटे पेट्रोल पंपासमोर उभा आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारताच त्याने त्याचे नाव कृष्णा राजू धोत्रे (वय 20, रा. बायाजीनगर, घाडगेवस्ती, एमआयडीसी बारामती) असे सांगितले. त्याचा साथीदार सुमित दिपक धोत्रे व दोन अल्पवयीन असे चारजणांनी मिळून मारहाण करून चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यातील सुमित धोत्रे हा मुळचा रा. मंगळवार पेठ, जीरपे गल्ली, फलटण जि. सातारा) येथील आहे. तर इतर दोन अल्पवयीन मुले हे रुई एमआयडीसीमधील आहेत. याबाबत अधिक तपास केला असता हा गुन्हा चौघांनी मिळून केला असल्याचे त्यांनी कबूल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक संदीप जाधव, स्वप्नील अहिवळे, रॉकी देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)