कामगारांनी आपल्या हक्कासाठी संघटीत होणे गरजेच

नगर – कामगारांनी आपल्या हक्कासाठी संघटीत होणे गरजेचे आहे. कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लाल बावटा युनियन त्यांच्या पाठिशी आहे. कामगार असंघटित असल्याने त्यांचे शोषण केले जाते. अरणगाव येथील कार्यालयाच्या माध्यमातून कामगार एकवटणार असून, आपल्या न्याय मागण्या मिळवण्यात ते यशस्वी ठरणार असल्याची आशा जिल्हाध्यक्ष कॉ.सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.

लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगार युनियनचे अरणगाव येथे कॉ.सुभाष लांडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव ऍड.सुधीर टोकेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात युनियनचे अध्यक्ष म्हणाले की, अवतार मेहेरबाबा ट्रस्टमध्ये 225 च्या पुढे कामगार असून, ते सिक्‍युरिटी, हेल्पर, मेंन्टनेस आदि विविध विभागात कार्यरत आहे. कामगारांना चार ते पाच हजार रुपयांवर महिनाभर राबविले जात आहे. या वेतनात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्‍य असून, कामगारांचे पगार वाढविण्याची मागणी युनियनने केली आहे. कामगारांचे किमान वेतन, पगारी रजा, कामगारांचे तडकाफडकी करण्यात येणारे निलंबन व अन्यायकारक मिळणारी वागणुक आदि प्रश्‍नबाबत कामगार एकवटले आहे. कामगारांची पिळवणूक थांबविण्यासाठी संघटनेच्या वतीने ट्रस्टशी पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

ऍड.सुधीर टोकेकेर म्हणाले की प्रचंड महागाईच्या काळात कामगारांना तुटपुंजे वेतन मिळत असल्याने सदर कामगार आर्थिक संकटात सापडले आहे. संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्‍न चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असून, प्रश्‍न न सुटल्यास कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या वतीने होणाऱ्या पिळवणुकीबद्दल अनेक कामगारांनी आपल्या भावना विशद केल्या. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, किशोर कांबळे, खजिनदार प्रभावती पाचारणे, प्रविण भिंगारदिवे, अनिल फसले, सुनिल दळवी, सुभाष शिंदे, राजेंद्र कल्हापुरे, राधाकिसन कांबळे, सुनिता जावळे आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार विजय भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)