कामगारांना बांधुन ट्रॅक्‍टर पळवला

सातारा,दि.17(प्रतिनिधी) – फार्महाऊस असलेल्या तीन कामगारांना बांधुन ट्रॅक्‍टर चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात तीघांच्या विरोधात अनिकेत अशोक तपासे (रा.मल्हारपेठ,सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
अनिकेत तपासे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सातारा तालुक्‍यातील अंबवडे गावात त्यांचे फार्महाऊस आहे. त्या फार्महाऊसवर तीन कामगार रखवाली करण्यासाठी आहेत. दि.15 रोजी त्या तीन कामगारांना दोरीने बांधुन अज्ञात तीघांनी तक्रारदार यांच्या आईच्या मालकीचा एमएच 11 सीजी 9268 हा ट्रॅक्‍टर चोरून नेला. याचा पुढील तपास सातारा तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र काळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)