कामगारांच्या सर्वागीण विकासासाठी पाच लाखाची मदत

वाई ः महाराष्ट्र कामगार कल्याणमार्फत धनादेश देताना मान्यवर.

वाई, दि. 5 (प्रतिनिधी) – राज्यातील कामगारांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृती, पाठ्यपुस्तक, एमएससीआयटी व असाध्यरोग योजनांतर्गत वाई शहर आणि तालुक्‍यातील कामगारांच्या पाल्यांना सन 2017 -2018 या वर्षासाठी सुमारे 5 लाख 35 हजार रुपये इतके अर्थसहाय्य मिळाल्याची माहिती गरवारे-वॉल रोप्स्‌ (गरवारे टेक्‍निकल फायबर्स) मधील कामगार व वाई तालुका अध्यक्ष दादासाहेब काळे यांनी दिली. यामध्ये गरवारे-वॉल रोप्स्‌ लि. (गरवारे टेक्‍निकल फायबर्स) उत्कर्ष पतसंस्था आणि एस. टी. महामंडळातील सुमारे 198 कामगारांना यांचा लाभ मिळाला. वैद्यकिय अर्थसहाय्य योजनेंतर्गत दुर्धर आजारावरील उपचारासाठी गरवारे-वॉल रोप्स्‌ (गरवारे टेक्‍निकल फायबर्स) मधील कामगार विकास करमाळे व श्रीकांत मांडवे याना प्रत्येकी रुपये 25000 (पंचवीस हजार रूपये) हजारांची मदत मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना दादासाहेब काळे म्हणाले, महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 अन्वये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अधिनियम कलम 6 ब नुसार कामगार कल्याण निधी (लेबर वेल्फेअर फंड) कपात होणाऱ्या सर्व बॅंका, पतसंस्था, प्रायव्हेट कंपन्या, प्रायव्हेट हॉस्पिटल, हॉटेल, दुकाने, आस्थापने, एलआयसी ऑफिस, एसटी महामंडळ, सूतगिरणी, दुधसघ, साखर कारखाने व इतर आस्थापने यामध्ये काम करणारे कामगार व कामगारांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. यात कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजनेंतर्गत इयत्ता 9 वी पासून पुढील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी (तांत्रिक, वैद्यकिय व अभियांत्रिकी) रुपये 2 ते 5 हजारपर्यंत वार्षिक शिष्यवृती दिली जाते. त्यासाठी मागील वर्षी किमान 60 टक्के गुण आवश्‍यक असतात. तसेच एपीएससी पुर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रुपये 5 हजार व युपीएससी पुर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रुपये 8 हजार दिले जातात. पीएचडी अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना रुपये 5 हजार अर्थसहाय्य दिले जाते. परदेशात पदव्युतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यास रुपये 50 हजार वार्षिक शिष्यवृती दिली जाते. पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्‍यक असते. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजनेंतर्गत इयत्ता 10 वीपासून पुढील शिक्षणासाठी कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या 50 टक्के रक्कम दिली जाते. एमएससीआयटी परिक्षेत 60 टक्के पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाल्यास शासनमान्य शुल्काच्या 50 टक्के कामगार आणि कामगार कुटुंबियांना दिली जाते.
कामगार आणि त्याच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त दादासाहेब काळे, कामगार कल्याण मंडळाचे कोल्हापूर सांगली विभागाचे अधिकारी अरूण लाडसाहेब, कामगार कल्याण मंडळ केंद्र साताराचे कर्मचारी दमयंती जाधव, सोमनाथ चोरगे ,जयश्री साळुंखे, गरवारे- वॉल रोप्सचे ( गरवारे टेक्‍निकल फायबर्स )असिस्टंट जनरल मॅनेजर वैभव जोशी साहेब, डेप्युटी मॅनेजर नंदकुमार जाधव साहेब, असिस्टंट मॅनेजर सुनिल पानसे साहेब, गरवारे वॉल रोप्स्‌ (गरवारे टेक्‍निकल फायबर्स ) एम्लॉईज युनियनचे पदाधिकारी व कंत्राटी कामगारांचे सुपरवायझर आदींचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगुन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ सर्व कामगारांनी घ्यावा. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज जमा करावेत असे आवाहन दादासाहेब काळे यांनी या वेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)