कामगारांच्या घोषणांनी सरकारला हादरे

देशव्यापी संपात नगरमधील 17 संघटनांचा सहभाग

अंगणवाडी संघटनेची जोरदार घोषणाबाजी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर – देशव्यापी संपात नगर जिल्ह्यातील कामगार महासंघ सहभागी झाला होता. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यावर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने सरकार हादरल्याचा टोला आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी व्यक्त केला. हमाल पंचायत, राज्य कर्मचारी संघटना, किसान सभा, आयटक, भाकप, महाराष्ट्र राज्य विडी फेडरेशन, सीपीएम, सर्व श्रमिक संघ, क्रांतीसिंह कामगार संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, स्वराज्य कामगार संघटना, अवतार मेहेरबाबा संघटना, आशा कर्मचारी संघटना, सिटू कामगार संघटना, महापालिका कामगार संघटना, वैद्यकीय संघटनाचे कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते.

किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, निरनिराळ्या योजनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा दजा, पगार आणि इतर सुविधा पुरविणे, खासगीकरणाला व मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कंत्राटीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकरण व जीवनाश्‍यक वस्तुच्या सट्टा बाजारावर बंदी घालावी, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावा, सर्व क्षेत्रातील कामगारांना 12 ते 18 हजारपर्यंत किमान वेतन द्या, शेमजूर, गरीब, शेतकरी व असंघटीत कामगारांना दरमहा 6 हजार पेन्शन योजना लागू करावी, कायम कामामधले कंत्राटीकरण ताबडतोब थांबवा

एमआयडीसी अहमदनगर येथे कामगारांसाठी 300 खाटांचे अद्यावत सुसज्ज हॉस्पिटल यापूर्वी निघालेल्या अधिसूचनेनुसार त्वरीत व्हाव, बोनस व भविष्य निर्वाहनिधी लागू होण्याकरिताच्या पात्रतेवरील कमाल मर्यादा काढून टाका, ग्रॅज्युईटीची रक्कम वाढवा, कामगागर संघटनांनी नोंदणीकरिता अर्ज केल्याच्या तारखेपासून 45 दिवसात नोंदणी करणे अनिवार्य करणे, विडी विक्रीवरील जीएसटी 28 टक्के रद्द करून पाच टक्के लागू करावा, तेलंगणा सरकारने विडी कामगारांना सहायता भत्ता म्हणून 1 हजार रुपये देत आहे, महाराष्ट्र सरकारने विडी कामगारांना 1 हजार रुपये द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, माथाडी मंडळास संरक्षण द्यावे, हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन 20 हजार रुपये द्यावे, औषधी व औषधी उत्पादनावरील जीएसटी रद्द करावा, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पतसंस्था कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी, अवतार मेहेरबाबा कर्मचारी, एमआयडीसीमधील कामगार व इतर असंघटीत कामगारांना 18 हजार रुपये वेतन करावे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीने पेन्शन सुरू करावी.

कंत्राटीकरण बंद करून शासकीय सेवेत नियमित कर्मचारी भरावेत, अशा प्रमुख मागण्यांही यावेळी करण्यात आले आहेत. बाबा आरगडे, अविनाश घुले, सुभाष तळेकर, विलास पेद्राम, ऍड. बन्शी सातपुते, ऍड. सुधीर टोकेकर, ऍड. सुभाष लांडे, शंकर न्यालपेल्ली, मधुकर केकाण, नंदू डहाणे, महेबूब सय्यद, पी. डी. कोळपकर, राजेंद्र बावके, बाळासाहेब सुरूडे, बहिरनाथ वाकळे, स्मिता औटी, बी. एस. दंडवते, विजय काकडे, योगेश गलांडे, अंबादास दौंड, एम. एम. शिंदे, सतीश पवार, निर्मला खोडदे, सुवर्णा थोरात, मंगल शिंगाणे, महादेव पालवे, अनंत लोखंडे, आनंद वायकर, पोपट जाधव, संतोष होसमनी, श्रीहरी गोरे, सतीश भूस, सुभाष कांबळे, विकास गेरंगे यांच्यासह शेकडो कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.

निवेदन शिष्टमंडळात महिलांना डावलले

कामगार संपातील प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. या शिष्टमंडळात एकही महिला नव्हती. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका जोरदार घोषणाबाजी करत होत्या. महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्या सचिव स्मिता औटी यांना शिष्टमंडळाचा हा प्रकार खटकला. त्यांनी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांना जागेवर फटकारले. “महिला येथे घशाला कोरड पडेपर्यंत घोषणाबाजी करत आहे आणि शिष्टमंडळात त्यांना प्रतिनिधीत्व नाही, हे चुकीचे आहे.’ औटी यांनी शिष्टमंडळाकडे पाठ फिरवली. आंदोलनाची समाप्ती झाल्यावर शिष्टमंडळातील काही प्रमुखांनी त्यांची समजूत घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)