कामगारांचा पीएफ थकवल्याने किसनवीर संचालकांवर गुन्हा

1100 कामगारांचे साडे तीन कोटी थकवला
सातारा-  कामारांचा भविष्य निर्वाह निधी थकवल्याप्रकरणी किसनवीर साखर कारखान्याविरोधात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी भविष्य निर्वाह निधीच्या कोल्हापुर कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी गोपाळ जोशी यांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जोशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, किसनवीर कारखाना व्यवस्थापनाने त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी दर महिन्याच्या 15 तारखेला भरणे आवश्‍यक होते. मात्र कारखाना व्यवस्थापनाने तसे न करता जानेवारी ते ऑगष्ट 2018 या काळात भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नाही. त्यांना जुन 2018 मध्ये भविष्य निर्वाह कार्यालयाने कारखाना व्यवस्थापनाला निधी न भरल्याने नोटीस पाठवली होती.

तरीही कारखाना व्यवस्थापनाने पैसे भरले नाहीत. जानेवारी ते ऑगष्ट या काळात एकूण आकराशे कामगारांचे 3 कोटी 49 लाख छपन्न हजार रुपयांचा भविष्य निर्वाह निधी कारखाना व्यवस्थापनाने भरला नाही. त्यामुळे काखान्याचे कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव ( रा. किसनवीर नगर,भुईंज) कारखान्याचे संचालक रतनसिंग सर्जेराव शिंदे (रा.परखंदी,ता वाई) यांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)