कामगारनगरी झालीय “मर्डर सिटी’

  • वर्षभरात 72 खून : पोलिसांना आव्हान, महिन्याला सरासरी 6 खून

पिंपरी – शहराची लोकसंख्या वाढत आहे तसा गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. त्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाचीही स्थापना करण्यात आली. आयुक्तांनी शहाराची धुरा सांभाळताच प्रत्येक गुन्ह्याची दखल घेत सर्व गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. 2018 साल गुन्हेगारीसाठी चांगलेच गाजले. दिवसा-ढवळ्या झालेले गोळीबार, चौकात वर्दळीच्यावेळी झालेला गुन्हेगाराचा खून यामुळे शहरातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली. मध्यंतरी गुन्हेगारी टोळ्यांनीही डोके वर काढले. शहरात 2018 या वर्षात एकूण 72 खून झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 63 खूनांचा छडा लालगा असून, 9 खून प्रकरणांचा अद्याप उलघडा झालेला नाही. अकेडेवारीनुसार गतवर्षी महिन्याला सरासही सहा खून झाले आहेत.

दापोडी येथे सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत आरोपीने तिचा खून केला व नंतर स्वतःही आत्महत्या केली. त्यामुळे 2019या वर्षातील खुनाची ही पहिली घटना होती. या आधी 2018 मध्येही सांगवी येथे तरुणीचा खून करत आरोपीने मृतदेहाजवळच गळफास घेत आत्महत्या केली होती. ही पुनरावृत्ती मंगळवारी (दि.22) दोपोडी येथे घडली. याबरोबरच 2018 या सालात महत्तवाच्या खुनाच्या घटना म्हणजे चिंचवड पोलीस ठाण्याजवळच 30 मे चापेकर चौकात आकाश लांडगे या वर्षीय तरुणाचा टोळक्‍याने धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ माजली होती. तसेच आळंदीचे नगरसेवक बालाजी कांबळे यांचाही 26 जून रोजी आलंकापुरम या चौकात दुपारी चारच्या सुमारास भर चौकात कोयत्याने डौक्‍यात वार करत खून केला. त्यामुळेही परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही खूनातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र तरीही या खूनाची दहशत अद्यापही शहरात आहे. त्यानंतर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काही सराईतांना एटक देखील केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर वाकड पोलीस ठाणे हद्दीत आठ दिवसांच्या कालावधीत दोन खून झाल्याने ही पोलीस खात्यावर टीका केली होती. वाकड येथे एका खसगी बस चालकाचा जून महिन्यात डोक्‍यात धारदार शस्त्राने वार करत खून करत खून केला होता, तर या खूनानंतर अवघ्या सता दिवसांच्या कालावधीत काळेवाडी येथील एका व्यावसायिकाचा अज्ञातांनी पाठलाग करत गोळी घालून भर रस्त्यावर खून केला होता. या खूनाचे आरोपीही पोलिसांच्या हाती लगाले नाहीत.

खूनांच्या घटनांप्रमाणे गोळीबारच्या घटनाही 2018 मध्ये घडल्या. त्यातील वाकड येथे एका व्यवसायीकावर गर्दीच्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला पण नशीब बलवत्त्र म्हणून व्यावसायीक तरुण हा थोडक्‍यात बचावला होता. आजमितीला शहरात आयुक्तालय आले आहे पण आयुक्तालय असताना व त्यापूर्वीही शहराने भर दिवसा, गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या खूनाची परंपरा कायम राखली आहे. कामासाठी शहरात येणे व गुन्हा करुन आपल्या राज्यात पळून जाणे हे आता कामगार नगरितील कामगारांची नवी बाजु बनत चालली आहे. शहरातील मोठ्या प्रमाणतील स्थलांतरीत लोकसंख्या ही सध्या मोठी समस्या बनत चालली आहे. त्यासाठी शहरात राहणारे कामगार, भाडेकरू यांची संपूर्ण माहिती पोलीस खात्याकडे असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त काहीउपक्रमही राबवत आहेत. मात्र शहरवासीयांनीही आपल्या घरी राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची माहिती ठेवणे, सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा काही उपाय योजना करणे अपेक्षीत आहे.

“ते’ दोन खून अनुत्तरीतच…
दपोडी येथे सात वर्षीय चिमुकलीचा खून झाला यामध्ये आरोपीनेही गळफास घेत आत्महत्या केली मात्र या घटनेमुळे पिंपरी व वाकड येथे झालेल्या दोन चिमुकल्यांच्या खुनाचीही आठवण सर्वांना झाली. पिंपरी येथे ही सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबूून खून केला व मृतदेह एच.ए मैदानावर टाकून देण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला आहे. तर वाकड येथे हात व पाय तोडलेल्या अवस्थेत पाच वर्षीय चिमुकल्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह अढळला होता. त्याची अद्याप ओळखही पटली नसून त्याच्या खूनाचाही तपास अद्याप सुरुच आहे. पिंपरीतील खूनातील आरोपीसाठी पोलीस पथके मागावर आहेत मात्र आरोपी हा परप्रांतीय असून त्याच्या गावी वडीलांचे निधन झाले तरी तो काही गावी फिरकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)