कामगारनगरीची शहिदांना मानवंदना

पिंपरी – भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान देणारे शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले, आकाश चव्हाण, संतोष जाधव, खुशाल पुरंदरे आदी उपस्थित होते.

दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर नितिन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मुगुटमल, चंद्रकांत डी. काटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, उद्यान निरीक्षक जयदेव पटेल, आरोग्य निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त के. एस. बी. चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महापौर नितिन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरसेविका अनुराधा गोरखे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, माथाडी संघटनेचे हनुमंत तरडे, संग्राम पाटील, पोपटराव धोंडे, शंकर निकम, धर्मा खिलार आदी उपस्थित होते.

शहीद दिनानिमित्त शहर कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते दापोडी येथे शहीद भगतसिंग व शहीद दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, अल्पसंख्यांक समिती प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जैयस्वाल, हिरा जाधव, तुषार पाटील, मकर यादव, नंदा तुळसे, हिरामण खवळे, माधव पुरी, राजू आतारी आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)