काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोटांत 20 जणांचा मृत्यू

50 पेक्षा अधिक जखमी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या दोन मोठ्या बॉम्बस्फोटांमध्ये 20 जण ठार झाले आहेत, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काबूल शहरातील क्रीडा संकुलात बुधवारी संध्याकाळी हे स्फोट झाले. स्थानिक वृत्तवाहिनी टोलो न्यूजचे दोन पत्रकार या हल्ल्यात ठार झाले आहेत. पहिला बॉम्बस्फोट होताच टोलो न्यूजचे दोन पत्रकार घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी पोहोचले. मात्र तितक्‍यात दुसरा स्फोट झाला आणि त्यामध्ये दोन्ही पत्रकारांचा मृत्यू झाला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

यातील पहिला आत्मघाती स्फोट कला-ए-नजरिया परिसरातील स्पोर्टस क्‍लबमध्ये झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. तर 30 जण जखमी झाले. यानंतर लगेचच दुसरा बॉम्बस्फोट झाला. यात 6 जण मृत्यूमुखी पडले. देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. ‘मी काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. या हल्ल्यात अनेक ऍथलिट्‌स, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही दहशतवादाविरोधात देश म्हणून एकत्र आहोत, याची आमच्या शुभचिंतकांना कल्पना आहे, असे करझाई यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

क्रीडा संकुलातील खेळाडू आणि पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात किती जणांचा मृत्यु झाला आणि किती जण जखमी झाले, याची अधिकृत माहिती अद्याप अफगाणिस्तान सरकारने दिलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)