काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात २५ ठार

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान २५ जण ठार झाले आहेत, तर सुमारे १८ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर परिसरात सगळीकडे मृतदेहांचा खच पडला होता.

एक आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे. गृहमंत्रालयाच्या मते, हा हल्लेखोर चालत आला होता. त्यानंतर त्याने काबूल विद्यापीठाजवळ स्वत:ला उडवले. हा स्फोट काबूल विद्यापीठ आणि अली अबद रूग्णालयादरम्यान झाला. सुरक्षादलांनी परिसर ताब्यात घेतला असून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अद्याप हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)