काबुल स्फोटातील बळींची संख्या 103 वर

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरात काल स्फोटकांनी भरलेली ऍम्ब्युलन्स जमावात घुसवून त्याद्वारे घडवून आणलेल्या स्फोटाच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता शंभरावर पोहचली आहे. तेथे आत्ता पर्यंत एकूण 103 जण ठार झाले असून जखमींची संख्या 265 इतकी आहे.

इस्लामिक बंडखोरांनी या शहरात या आठवड्यात घडवलेला हा दुसरा मोठा हल्ल आहे. या हल्ल्याच्या घटनेने देशभर आज राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. शहरातील बहुतांशी व्यवहार आज बंद होते. या मोठ्या धमाक्‍याने सारा देश हादरला आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधीत गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी विदेशी नागरीकांचा वावर असलेल्या भागात आणखीही स्फोट घडवून आणण्ययाचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध करताना तालिबान्यांवर आता निर्णायक कारवाई करा अशी सुचना अफगाणिस्तान सरकारला केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)