काबुल मधील स्फोटात 26 ठार

संग्रहित छायाचित्र

काबुल – अफगाणिस्तानातील काबुल शहरातील काबुल विद्यापीठासमोर एका दहशतवाद्याने स्वत: भोवती लपेटलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणत किमान 26 जणांना ठार मारले तर या स्फोटात तेवढेच लोक जखमी झाले आहेत. आज पारशी नववर्ष दिनानिमीत्त काबुल शहरात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याची संधी साधून तालिबानी दहशतवाद्याने हा स्फोट घडवला.

हा आत्मघाती स्फोटातील व्यक्तीने घडवलेला कार बॉंबचा स्फोट होता असे काहींचे म्हणणे आहे. घटनास्थळी सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली असून तेथील जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यासाठी अनेक रूग्णवाहिका तेथे नेण्यात आल्या आहेत. नेमके किती जण जखमी झाले आहेत याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)