काबुल दहशवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन?

काबुल : गेल्या शनिवारी काबुलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून साहित्यांचा पुरवठा करण्यात आला होता, असा आरोप अफगाणिस्तानचे राजदूत मजीद करार टुक यांनी केला आहे. पाकिस्तानच्या लष्कराकडून अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांना या शस्त्रांचा पुरवठा करण्यात करण्यात येत आहे, असे देखील टुक यांनी म्हटले आहे. गेल्या शनिवारी काबुलमधील सैनिकी प्रशिक्षण केंद्रावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यामध्ये १०३ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. पाकिस्तानमधील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यासंबंधीचे कसलेही ठोस पुरावे, अफगाण सरकारच्या हाती लागलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)