काबुलमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 25 जणांचा मृत्यू

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील संसदेजवळ दोन साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. यात 25 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा संचालक मंडळ (एनडीएस) च्या कार्यालयाजवळ स्थानिक वेळानुसार सांयकाळी 3.45 वाजण्याच्या सुमारास दोन शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. दार-उल-अमान भागात झालेला स्फोट लोक सरकारी कार्यालयातून बाहेर निघत असताना झाला. या 25 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एनडीएस कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी एका मिनी बसमध्ये बॉम्ब ठेवले असल्याची माहिती एनडीएसच्या सुत्रांनी दिली आहे. गर्दीच्या वेळी हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. एनडीएस या अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी कारमध्ये असलेल्या दहशतवाद्याने स्वत:ला उडवत स्फोट घडवून आणला. हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सरकारी कार्यालये आणि वर्दळीच्या ठिकाणाहून दूर राहण्याचे आवाहन येथील सरकारने नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)