काबुलमध्ये बॉम्बस्फोट; ४० जणांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर,७५  हून अधिक नागरिक जखमी झालेआहेत.अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी या दुर्घटनेत ४० नागरिक ठार  तर ७५ नागरिक जखमी झाल्याची माहिती दिली.ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला त्याच परिसरात अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाची इमारत तसेच इतर देशांचे दूतावास आहेत. सुरक्षा दलाने सुरक्षेच्या दृष्टीने गृह मंत्रालयाची इमारत रिकामी केली आहे.

अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयातील प्रवक्ता नसरत रहीमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत बसलेल्या दहशतवाद्यांनी चेक पोस्टवर पोलिसांना सांगितलं की, रुग्णाला जवळील हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. त्यानंतर दुसऱ्या चेक पॉईंटवर त्यांनी रुग्णवाहिकेत ठेवलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)