कापूर, वेलचीही “स्वाइन फ्लू’ च्या विळख्यात!

घरगुती उपायांकडे तालुक्‍याचा कल; भाव झाले दुप्पट

अकोले – अकोले तालुका “स्वाइन फ्लू’च्या विळख्यात आहे. अकोले तालुक्‍यात “स्वाइन फ्लू’चे संशयित 26 रुग्ण आहेत. पूर्वी पाच रुग्ण दगावले आहेत. त्याची कर्णोपकर्णी चर्चा वाढली आणि प्रसारमाध्यमांमुळे आरोग्य विभागाने अधिक गतीने रुग्ण तपासणी हाती घेतली. आज अखेर 3450 रुग्णांची तपासणी केली, असे सांगण्यात आले. या आजाराबाबात जागृतीचे मोठे काम केले गेले. त्याचा परिणाम शाळा व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घरघुती व ग्रामीण उपाय म्हणून कापूर वडी व वेलची यांचे मिश्रण रुमालाला बांधण्याचे आणि त्याचा वास घेण्याचे उपाय घरोघरी पोचले. त्यामुळे कापूर, निलगिरी व लवंग तेल यांचे भाव वाढले. त्यामुळे सध्या कापूर, निलगिरी व लवंग तेल हे “स्वाइन फ्लू’च्या विळख्यात सापडले असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.पूर्वी कापूर डबी 5 रुपयांना मिळत असे. तीच डबी आता वड्याच्या संख्येवरून 10, 15 व 20 रुपयांपर्यंत मिळते आहे. कापूर वडीचा जो पाउच 35 रुपयांना मिळत होता, तोच आता 60 ते 78 रुपयांपर्यंत मिळतो आहे. कागदी वड्या आता उपलब्ध नाहीत असे किराणा दुकानदार दत्ता व विलास कराळे या भावांनी सांगितले. केरळात ऐतिहासिक पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे विलायचीचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे वेलचीची विक्री आज जरी 20 रुपये तोळा असली, तरीही नजीकच्या काळात त्याचे भाव सध्याच्या मागणीने वाढण्याची भीती सुनील मालुंजकर यांनी व्यक्त केली. लवंग तेल व निलगिरी तेल बाजारातून गायब होत असल्याचे समजते. हे सर्व वाण “स्वाइन फ्लूच्या विळख्यात आलेले आहेत, अशी चर्चा होत असताना “स्वाइन फ्लू’च्या दहशतीने सामाजिक पटलावर भीतीचे वातावरण कायम आहे.
तालुक्‍यात आतापर्यंत पाच रुग्ण दगावाले आहेत. याची सर्व तालुक्‍यात चर्चा झाल्याने या रोगाची दहशत कायम बसली आणि दवाखाने आणि इतर गावठी उपाय झपाट्याने गावागावात वाढत आहेत. सरकारी दवाखान्याबरोबर खासगी मेडिकलमध्येही “टॅमी फ्लू’च्या गोळ्या उपलब्ध आहेत.250 रुपयांना 10 अशा या औषधी गोळ्या खासगीत विकल्या जात आहेत. बाजारात प्रतिबंधात्मक “व्हॅक्‍सीन फ्लू’ ही लस उपलबद्ध आहे, असे अवधूत आरोटे मेडिकलचे संचालक रमेश आरोटे व मातोश्री मेडिकलचे संचालक राजेश धुमाळ यांनी सांगितले. प्रत्येकाच्या मनात ही लस घेण्याची मानसिकता मात्र दिसत नाही, असे औषध विक्रेते ज्ञानेश्वर आरोटे यांनी स्पष्ट केले. आरोग्याधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे म्हणाले, की हा रोग पूर्णपणे संसर्गजन्य असल्याने या रुग्णांपासून इतरांनी दूर राहावे. शिवाय ताजे अन्न खावे. ताजा भाजीपाला खावा आणि आपल्याला संशय आलाच तर सरकारी अथवा इतर खासगी दवाखान्यात रुग्णाला दाखल करावे, असे आवाहन केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)