कापूरहोळ येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीत 111 प्रकरणे निकाली

भोर- भोर तालुक्‍यातील कापुरहोळ येथे शुक्रवारी (दि.3) मोबाईल व्हॅन लोकअदालत आणि कायदे विषयक शिबिरात एकूण 111 प्रकरणांत तडजोड होऊन 12 लाख 33 हजार 343 रुपयांची वसुली झाली. यात 2 दिवाणी, 1 फौजदारी आणि 108 दाखलपूर्व प्रकरणात तडजोड करण्यात आली.
उच्च न्यायालय विधी सेवा समिती मुंबई यांच्या निर्देशानुसार पुणे जिल्हा विधी सेवा समिती प्राधिकरण, विधी सेवा समिती भोर आणि भोर तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे उद्‌घाटन भोर न्यालयाचे मुख्य न्याधीश आर.एच. नाथानी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकअदालतीचे पॅनल प्रमुख निवृत्त न्यायाधीश डी. डी. कांबळे, भोर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. दीपक चौधरी, जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष वाय. जी. शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. गोपाळ धाडवे पाटील, ऍड. प्रकाश लिम्हण, ऍड. शिवाजी मरळ, ऍड. उरणकर, ऍड., सोपान कोंढाळकर, ऍड. विठ्ठल दुधाणे, ऍड. आर. व्ही. बोरगे, भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष हराळे, ऍड. टी. आर. देशमुख, ऍड. तांबेकर, ऍड. पी. यू. चव्हाण, ऍड. विश्‍वनाथ रोमण, ऍड. वाय. एन. शिंदे, ऍड. विजय दामगुडे, दिलीप बाठे यांच्यासह तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, पक्षकार उपस्थित होते,
डी. डी. कांबळे म्हणाले की, भारतीय संविधानाने बंधुता, समानता, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करावा असे आवाहन करुन न्यायालय आणि न्यायदान या विषयी सखोल माहिती दिली. दरम्यान, पॅनल सदस्य म्हणून ऍड, दत्तात्रय उरणकर, वाय. एन. शिंदे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)