कापूरहोळजवळ बिबट्याचा दोघांवर हल्ला

संग्रहित छायाचित्र

कापुरहोळ – दिवळे (ता. भोर) येथे बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दोनच्या सुमारास अंगणात झोपलेले असलेल्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर येथील वनक्षेत्रपाल यांनी दिलेली माहिती अशी की, दिवळे येथे बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घराच्या अंगणात झोपलेल्या सुरेश संपतराव जगताप (वय 54) व चंद्रकांत गोपाळ पांगरे (वय 33) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

यांच्यावर अचानक हल्ला करीत दोन बिबट्या नि त्याना जखमी केले यात बिबट्याने जगताप यांच्या हाताला चावा घेत पाठीला व हाताला पंजामारीत ओरखडे ओढले तर पांगरे यांच्या पोटाला चावा घेत दोन्ही हाताला व पायाला पंजाचे ओरखडे ओढून जखमी केले त्यामुळे आरडाओरडा झाल्यावर भोवताली लोक जमा झावर एक मोठा व लहान बिबट्याने धूम ठोकली पण अंधारातून पळताना प्रकाश गणपत जगताप याची म्हशी ला व संतोष मारुती जगताप यांची एक गाय व तिचे वासरू यांच्यावर हल्ला करीत जखमी केले तर गुलाब महादेव साळवे यांच्या तीन महिन्यांच्या वासराच्या कानावर हल्ला करीत कानाचा काही भाग तोडून नेहाला मागील काही दिवसांपूर्वी दिवळे येथील ज्या ज्या परिसरात तीन बबिबट्याचा मृत्यू झाला होता तेथे च परिसरात पुन्हा घटना घडल्यामुळे दिवळे गावाच्या पंचक्रोशीतील नागरिक घाबरले आहेत घटनेची माहिती वन विभाला मिळताच नसरापूर वनविभागाचे वनपाल एस यु जाधवर व वनकर्मचर्यानी घटनेचा पंचनामा करून जखमी ना ताबडतोब वैदयकीय उपचारासाठी ससून येथे हलविले तेथे पुढील उपचार सुरू असून दोघांची प्रकृती ठीक आहे.

-Ads-

नसरापूर चे वनपरिक्षेत्र अधीकारी एम डी दिघे म्हनाले की ,जखमी ना सर्वती मदत करीत असून शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे तसेच परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येत आहे परिसरातील नागरिकांना रात्रीअपरात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)