कापड दुकान फोडून आठ लाखांचा माल लंपास

कोरेगावमधील घटना : चोरट्यांनी 13 पोत्यांमधून नेला माल

कोरेगाव, (प्रतिनिधी) –

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगावच्या मध्यवर्ती असलेल्या कल्पराज व्यापारी संकुलातील पद्मावती सारीज हे साड्यांचे दुकान चोरट्यांनी रात्री फोडून अकरा हजार रोख रकमेसह आठ लाखांचा माल चोरून नेला.
याबाबत माहिती अशी, सातारा-पंढरपूर रस्त्यालगत कोरेगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कल्पराज व्यापारी संकुलात तळमजल्यावर प्रवीण ओसवाल यांचे पद्मावती सारीज हे साड्या व ड्रेस मटेरिअल दुकान आहे. शनिवारी रात्री कटावणीच्या चोरट्यांनी कटावणीने दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानात प्रवेश केला. यानंतर दुकानातील काउंटरचे लॉक तोडून अकरा हजारांची रोकड रक्कम काढून घेतली. त्यानंतर चार लाख रुपयांचे लाचा साडीचे 200 नग, एक लाख वीस हजाराच्या पैठणी साड्या (60 नग), एक लाख किंमतीच्या माहेश्वरी साड्या (100 नग), पन्नास हजार किमतीचे पाऊच पॅकिंग साड्या (50 नग), चाळीस हजार किंमतीचे वन पीस ड्रेस मटेरियल (50 नग), बत्तीस हजार रुपयांचे काठ पदराच्या साड्या (40 नग), तीस हजार रुपयांच्या वर्क साड्या े(15 नग), बारा हजार रुपयांच्या इरकल साड्या असे 7 लाख 95 हजार किंमतीच्या साड्या व ड्रेस मटेरियल चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातील माल चोरण्यासाठी सोबत 13 पोती आणली होती. दुकानाचे शटर तोडलेल्याची माहिती शेजारी असलेल्या डिलक्‍स सलून शॉपचे मालक सुनील पवार यांनी फोन द्वारे प्रवीण ओसवाल यांना सकाळी 8 च्या दरम्यान दिली. लगेच प्रवीण ओसवाल यांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानाचे शटर तोडून आतील किमती माल चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच कोरेगाव पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. तसेच पद्मावती सारीज च्या शेजारी श्रीरंग साप्ते यांच्या लिलाई कलेक्‍शन कपड्याच्या दुकानातील सीसी टीव्ही फुटेज चेक केल्यानंतर तोंडाला रुमाल बांधलेल्या, डोक्‍यात टोपी घातलेल्या एका युवकाने रात्री 12:15 ला प्रवेश करून साड्या भरलेल्या 13 पोती लिलाई कलेक्‍शन दुकानापुढे मोकळ्या जागेत आणून ठेवली. पहाटे 5:15 नंतर रस्त्या वरती उभ्या असलेल्या गाडीत माल टाकून पलायन केले.
पोलीस उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादासाहेब चूडाप्पा यांच्यासह पथकाने सातारा-पंढरपूर रस्त्याचे अनेक दुकानाचे सीसी टीव्ही फुटेज चेक करून अज्ञात चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला.या वेळी साताराहुन श्वान पथकही मागवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)