कापडी पिशव्यांबनविण्यासाठी साड्या भेट

राजगुरूनगर- राजगुरुनगर नगरपरिषदेने केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या आवाहनानुसार शिवसेना खेड तालुका महिला आघाडीच्यावतीने नगरपरिषदेला कापडी पिशव्या बनविण्यासाठी 101 वापरत नसलेल्या साड्या भेट देण्यात आल्या. या उपक्रमाचे नगरपरिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
राजगुरुनगर शहरात संपूर्ण प्लॅस्टिक बंदी करण्यात येणार आहे. नागरिकांना प्लॅस्टिक बंदीला पर्याय म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांच्या वापरात नसलेल्या व जुन्या साड्या गोळा करून त्यातून कापडी पिशवी तयार करण्यात येणार आहे. ही तयार पिशवी नागरिकांना मोफत वाटण्यात येणार आहे त्यामुळे प्लॅस्टिक पिशवी वापरावर मर्यादा येतील. गोळा झालेल्या साड्याच्या शहरातील महिला बचत गटाच्या महिलांकडून त्याच्या कापडी पिशव्या शिवण्याचे काम सुरु आहे आतापर्यंत जवळपास चार ते पाच हजार कापडी पिशव्या शिवल्या गेल्या आहेत. यातून बचत गटातील महिलांना नगरपरिषदेने रोजगार निर्माण करून दिला आहे. या उपक्रमात शिवसेना जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, माजी उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, शहर प्रमुख उर्मिला सांडभोर, अर्चना सांडभोर, मंगल सोनवणे, मीना आगरवाल, रोहिणी मिरजे, नूतन जाधव, अनिता अफरांदे यांच्यासह शाखा प्रमुख उपप्रमुख महिलांच्या वतीने साड्या गोळा करून नगरपरिषदेला देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक रेखा क्षोत्रीय, राहुल आढारी, मनोहर सांडभोर, सचिन मधवे, शंकर राक्षे, नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)