कान, नाकाच्या विकारावर आयुर्वेदिक उपचार

सहसा कान, नाकाचे विकार अथवा तोंड येणे अशा तक्रारींवर पटकन एखादी गोळी घेऊन मोकळे होण्याची आपली मानसिकता असते. मात्र, आयुर्वेदातही अशा विविध समस्यांवर प्रभावी उपाय आहेत. जुनी दुखणी बरी करायची असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही, हे खरेच आहे.

लीकडे आहार आणि विहाराच्या सवयी बदलत आहेत. चटपटीत, तळलेले, मसालेदार आणि आंबवलेले पदार्थ सेवन, अधिक मांसाहार, रात्री जागरण, दिवसा झोप आदींमुळे आजार वाढत आहेत. तसेच गुटखा, तंबाखू, धूम्रपान, मुख अस्वास्थ्य याही गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. तोंड येणे (मुखपाक), घसा दुखणे (गलग्रह), टॉन्सिलच्या गाठी वाढणे हे आजार सर्रास आढळून येत आहेत.
आयुर्वेदामध्ये स्थानिक चिकित्सेचे (शरीरातील एखाद्या मर्यादित भागापुरती चिकित्सा) महत्त्व विशेषत्वाने आढळून येते. कारण त्याद्वारे औषधद्रव्ये ही प्रत्यक्ष व त्वरित त्या भागावर जाऊन आपला प्रभाव दाखवतात व रोगाची लक्षणे कमी करून व्याधी बरी करतात. हीच उपचार पद्धती आपण मुखाच्या व्याधींमध्ये अवलंबतो. यामध्ये गंडूष म्हणजे मुखामध्ये औषधीसिद्ध काढ्याचे धारण केले जाते. कवल म्हणजे औषधी सिद्ध काढ्याने गुळण्या केल्या जातात. प्रतिसारण म्हणजे औषधी द्रव्यांच्या चुर्णांचे घर्षण केले जाते. रक्‍तमोक्षण दूषित रक्‍त काढून घेतल्या जाते. हे सर्व उपाय मुखरोगांमध्ये अत्यंत फलदायी ठरतात. यासोबतच पथ्यापथ्याने म्हणजेच अयोग्य वस्तूंचे सेवन टाळणे योग्य गोष्टीचे सेवन करणे यांचेही साम्य राखले पाहिजे. म्हणजे रोग समूळ नष्ट होतील व पुन्हा उद्‌भवणार नाहीत.
मानेच्या वर असणारा व ज्यामध्ये सर्व प्राण्यांचे प्राण व इंद्रियाचे केंद्र स्थित असते. त्या अवयवाला शीर म्हणतात. शरीरातील प्रधान अवयवांमध्ये याची गणना होते. पूर्ण शीर दुखणे, झोपेतून उठल्यावर सूर्याच्या प्रखरतेप्रमाणे वाढणारा व नंतर हळूहळू कमी होणारा शीरःशूप सूर्यावर्त यामध्ये नाकामध्ये औषधी सोडणे ज्याला आयुर्वेदिक परिभाषेत नस्य म्हणतात. ही उत्तम उपचार पद्धती आहे.
औषधीसिद्ध तेलाने मुखभागी मालीश व शेक घेऊन दोन्ही नागपुडीत 2-2 थेंब 7 दिवस टाकले जाते. नाकाच्या मुळाच्या ठिकाणी श्‍लेष्मल कलेमध्ये ग्रंथग्रहण करणाऱ्या नाड्यास्थित असतात. या नाडीद्वारे संकेत हे मेंदूपर्यंत पोहोचविले जातात व ग्रंथगृहणाची प्रक्रिया हेते. याच मार्गाने नाकात टाकलेले औषधी द्रव्य हे शीर- मेंदूपर्यंत जाऊन आपला प्रभाव दाखवितात. ही स्थानिक उपचार पद्धती असल्याने त्वरित रोग बरा करण्यास मदत करतात. नाकात औषधी सोडणे हे जुनाट सर्दी, ऍलर्जी यामुळे होणारी सर्दी, नाकात खपल्या तयार होणे, नाकाचे हाड वाढणे यावर प्रभावी ठरते. ही उपचार पद्धती बहुगुणी आहे. कान, नाक, मेंदू, डोळे यांच्या सगळ्या रोगांवर उपयुक्‍त आहे सर्दीचा पुन्हा उद्‌भवू नये म्हणून च्यवनप्राश, चित्रक हरितकी, व्योषादी वटी, शितोपलादी चुर्ण ही औषधे कार्य करतात.

 

सध्या ध्वनिप्रदूषणाने कानाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सतत अतिप्रमाणात व अत्यंत मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने त्याचा परिणाम हा ध्वनीहवन करणाऱ्या नसावर होऊन त्या कमकुवत बनतात. कर्णबाधिर्य उत्पन्न करतात. आयुर्वेदामध्ये त्यावर अत्यंत फलदायी अशी चिकित्सा पद्धती उपलब्ध आहे. त्यामध्ये विल्वतैल कर्णपुरण हे कमकुवत झालेल्या नसांना बल देऊन बाधिर्यता नष्ट करण्याचे काम करतात. या शिवाय नाकात औषधीयुक्‍त तैल टाकल्याने म्हणजेच नस्याने मानेच्या वरच्या भागातील अवयवांना व प्रामुख्याने कानातील नसांना बल मिळते व बाधिर्यता कमी होण्यास मदत होते.

पोहण्याच्या सवयी, हवेतील धूर, धूळ, प्रदूषणामुळे कानामध्ये बुरशी जमा होणे, पुयस्राव जलस्राव निर्माण होणे, कर्णदुर्गंधी यामध्ये कर्णधूपण म्हणजे औषधीद्रव्याची वाफ किंवा धूर कानास दिल्याने फायदा होतो. विडंग हे कृमीनाशक द्रव्य आहे. कानातील बुरशीचा नाश हा विडंग द्रव्याच्या धूपनाने होतो. या व्यतिरिक्‍त राळ, निम्बपत्र, गुग्गुळ यांच्या धूपनाने कर्णस्राव, दुर्गंधी, वेदना कमी होण्यास मदत होते. कर्णपुरण, कर्णधूपन, नस्य या तिन्ही स्थानिक उपचारात औषधीद्रव्य ही त्वरित त्या भागापर्यंत जाऊन आपला प्रभाव दाखवितात. हिंग्वादी क्षार तेल, कुष्ठादी तैल, द्राव्यादी तैल, अपामार्ग क्षार तेल, क्षार तेल ही अन्य कर्णकरणार्थ वापरण्यात येणारी द्रव्ये ही तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने कानात टाकावीत. आभ्यंतर म्हणजे सार्वदैहिक औषधी मुखाद्वारे घेतल्याने उशिराने पण नक्की फायदा होतो. त्यामध्ये इंदुवटी सारिवादी वटी, रान्सादी गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी वटी, गंधक रसायन यांचा समावेश होतो.
शिरोबस्ती, शिरोधारा हे दोन उपक्रम शिरोगत व्याधीसोबतच कानाच्या व्याधीसाठीही उपयुक्‍त ठरतात. शिरोबस्ती या उपक्रमात औषधीसिद्ध तेलाचे शिरसथानी विशिष्ट काळापर्यंत धारण केल्या जाते. शिरोधारा यात औषधी द्रव्याची धार ही सतत शिरावरती विशिष्ट काळापर्यंत सोडावी लागते. हे प्रधान कर्म करण्याअगोदर मुखभागी तिळतेलाने मालिश (स्नेहन), शेक (स्वेद) द्यावा लागतो. त्यानंतर बलातेल, शतपाकी बला तेल यांचा उपयोग शिरोबस्ती व शिरोधारा यासाठी करता येतो. यामुळे कानात वेदना होणे, शंखाप्रमाणे, मृदंगाप्रमाणे, वेणूघोषाप्रमाणे आवाज येणे, कमी प्रमाणात ऐकू येणे हे सर्व कमी होतात. आयुर्वेदात चिकित्सेचा दुसरा भाग म्हणजे निदान परिवर्जन चिकित्सा- यामध्ये ज्या कारणामुळे रोग उत्पन्न होतात, ती कारणे दूर करणे याचा समावेश होतो. थंड पदार्थ अतिसेवनाने, बेकरीचे पदार्थ सेवनाने गळ्याच्या ठिकाणी शोध घेऊन ते इन्फेक्‍शन कानापर्यंत जाते. त्यामुळे कानाचे रोग होतात. म्हणून पथ्यापथ्य पालनालाही विशेष महत्त्व आहे. या प्रकारे पंचज्ञानेद्रियांपैकी काना, नासा, मुख ही अवयव अनुक्रमे श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय यांना धारण करणारे व शिर या प्रधान अंगाचे रक्षण आयुर्वेद व आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या दिनचर्या व ऋतुचर्या यांच्या सहाय्याने करता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)