कान्हे येथे वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालयास लायन्स इन्व्हर्टर युनिट

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील लायन्स क्‍लब ऑफ वडगाव आणि ग्रामीण रुग्णालय (कान्हे) यांच्या वतीने इन्व्हर्टर युनिट प्रकल्प सुरू करण्यात आला.

प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया विभागांना विना अडथळा 24 तास रुग्णसेवा करण्यासाठी तसेच अखंड वीज पुरवठा होऊन या विभागांच्या बळकटीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय (कान्हे) येथे लायन्स क्‍लबचे राष्ट्रीय समिती सदस्य भूषण मुथा यांच्या पुढाकाराने नुकतेच लायन्स इन्व्हर्टर युनिटची सुरुवात करण्यात आली.

नामांकित कंपनीचे इन्व्हर्टर आणि बॅटरी संच असे या लायन्स इन्व्हर्टर युनिट चे स्वरुप आहे. लायन्स क्‍लबचे जिल्हा पदाधिकारी अभय शास्त्री यांचे हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर होते.

या वेळी मावळ पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम, कान्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री सातकर, उद्योजक राजेंद्र सातकर, लायन्स क्‍लब ऑफ वडगावचे अध्यक्ष प्रदीप बाफना, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोद गडीकर, सचिव झुंबरलाल कर्णावट, खजिनदार नंदकिशोर गाडे, प्रकल्प प्रमुख सुनीत कदम, संचालक बाळासाहेब बोरावके, अमोल मुथा, संजय भंडारी, आदिनाथ ढमाले, उद्योजक पियुष बाफना आदी उपस्थित होते.

अभय शास्त्री म्हणाले की, लायन्स क्‍लब समाजोपयोगी उपक्रमातून सामाजिक वसा कायम जपत आहे. लायन्स इन्व्हर्टर युनिट मुळे रुग्णालयात 24 तास प्रकाश राहणार असून, रुग्णसेवा कायम करण्यासाठी मदतच होईल. लायन्स क्‍लब ऑफ वडगावचे अध्यक्ष प्रदीप बाफना यांनी लायन्स क्‍लब ऑफ वडगावच्या सेवाकार्याची माहिती दिली.
उपसभापती शांताराम कदम यांनी मनोगतात म्हणाले की, लायन्स क्‍लब करीत असलेल्या उत्तम सामाजिक कामगिरीबद्दल समाधान व्यक्‍त केले व यापुढेही अशीच सेवाकार्ये घडवीत, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अशा प्रकारचे प्रकल्प सर्वत्र व्हावेत जेणेकरून रुग्णांना याचा लाभ मिळेल आणि त्यांची होणारी गैरसोय टळेल, अशी भावना व्यक्त केली व या अतिशय उपयुक्त सेवाकार्याचे कौतुक करत लायन्स मार्फत होत असणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्‍त केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. आमोद गडीकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)