कान्हे-टाकवे रस्त्यावर धोकादायक खोदकाम

वडगाव मावळ – कान्हे-टाकवे बुद्रुक रस्त्या दरम्यान कान्हे हद्दीत डांबरी रस्त्यालगतच धोकादायक खोदकाम करुन “व्होडाफोन’ची केबल टाकण्याचे काम सुरू आहे.

या रस्त्यावरुन औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक सुरू असते. त्यातच हा रस्ता अरुंद असल्याने वाहने रस्त्याच्या बाजूला येताच वाहनांची टायर अडकून वाहने उलटण्याची शक्‍यता आहे. खोदकाम केलेली माती रस्त्यावर आली आहे. ठेकेदाराकडून हलगर्जीपणा होत असल्याने बाबाजी गायकवाड, रोहिदास आसवले आदींनी विरोध केला.

-Ads-

घटनास्थळी शनिवारी (दि. 24) सार्वजनिक बांधकाम विभाग मावळ उप अभियंता राकेश सोनवणे, शाखा अभियंता डी. जे. पाटील यांनी पाहणी करून सुरू असलेले धोकादायक खोदकाम थांबवून पूर्ण चौकशी केली. एक मीटर खोल खोदून त्यांना केबल टाकण्याची शासनाकडून परवानगी आहे. पण रस्त्यालगतच सुरू असलेले धोकादायक खोदकाम थांबवून रस्त्याच्या साईटपट्टीच्या काही अंतरावर खोदकाम करुन केबल टाकण्याची सूचना दिली. चुकीच्या पद्धतीने केलेल्या खोदकामाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात येणार आहे.
कान्हे : कान्हे हद्दीत डांबरी रस्त्यालगतच धोकादायक खोदकाम.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)