कान्हाचे जंगल अन्‌ व्याघ्र दर्शन!

  • अनोखी सफर : तळेगावच्या निसर्गप्रेमींनी लुटला जंगल सफारीचा आनंद

तळेगाव दाभाडे – गेली पाच वर्षे तळेगाव येथील फ्रेंड्‌स ऑफ नेचर्स असोशिएशन बरोबर जंगल सफारीचा छान अनुभव घेतोय. या वेळी जबलपूरपासून 160 कि. मी. अंतरावर मध्यप्रदेशमध्ये असलेल्या कान्हा या निसर्गरम्य जंगल सफारीचा आनंद घेता आला. हे जंगल विविध प्राणी आणि पक्षी यांनी समृद्ध आहे.

फ्रेंडस्‌ ऑफ नेचर्स बरोबरची जंगल सफारी म्हणजे केवळ जंगल पहाणे एवढेच नसते तर ती एक जंगल समजून घेणे, जंगल वाचण्याची, विविध पशु पक्ष्यांविषयीच्या आपल्या ज्ञानात भर घालणारी सुंदर अनुभूती असते. वातानूकुलित रहायची व खानपानाची सुंदर व्यवस्था, जंगल सफारीसाठी मारुती जिप्सी, जाताना येताना रेल्वेचा आणि रेल्वे स्टेशनपासून जंगलातील हॉटेलपर्यंतचा वातानुकुलित प्रवास 45 अंश तपमानाच्या झळा जाणवू देत नाही.
या वेळी पहिल्याच दिवशी आमच्या टीमला जबलपूरला बेडाघाटचा धुवाधार धबधबा आणि संगमरवरी डोंगरातून नर्मदेच्या निळ्याशार पाण्यातील बोटिंगचा आल्हाददायक अनुभव घेतला.

पहिल्याच दिवशी कान्हा झोन मधल्या नीलम नामक वाघिणीने दर्शन दिले आणि सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यानंतर व्याघ्र दर्शनाची मालिकाच सुरू झाली पाणी पिणारी धवाजहंडी वाघीण, छोटा मुन्ना वाघ, डीजे वाघ. वास्तविक वाघापेक्षाही जास्त खूप काही बघण्यासारखे असते. रानगवे, विविध प्रकारची हरणे (बर्किंग डीअर, स्पॉटेड डीअर, बार्शिन्गा) कोल्हे, अस्वल, रानडुक्कर, वानरे, डौलदार मोर अशा अनेक प्राण्याचे जवळून दर्शन झाले.

साल वृक्षाचे घनदाट हिरवे जंगल मनाला भुरळ घालत होते. पक्षांच्या विविध जाती बघायला मिळाल्या… तुरेवाला सर्प गरुड, तांबट, इंडिअन रोलर, पांढऱ्या गळ्याचा किंगफिशर, कोतवाल, कुदळ्या, नीलकंठ, गिधाडे असे अनेक मनमोहक विविध रंगी पक्षी बघण्यातली मजा काही औरच होती.

किसली, कान्हा, मुक्की आणि सारी अशा चार झोनमध्ये कान्हा जंगल विभागले गेले आहे. या वेळी वादळ आणि पावसाचा अनुभव पण आला. ओले चिंब जंगल बघायला मजा आल्याचे भावना अनेकांची होती.
मंदार थरवळ, अनिल जाधव, रोहित नागलगाव यांच्या उत्तम नियोजन, उत्तम व्यवस्था व काटेकोर अंमलबजावणीमुळे सफारीचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला. या वर्षी कान्हा जंगल सफारीच्या दोन बॅचेस गेल्या होत्या. एका बॅचचे नियोजन दिलीप कडुसकर यांनी केले होते.

वर्षभर विधायक उपक्रम…
आपण जंगल सफरीचा आनंद घेऊ शकता; पण यासाठी आपल्याला फ्रेंड्‌स ऑफ नेचर्स असोशिएशनचे सभासदत्व घ्यावे लागेल. फ्रेंड्‌स ऑफ नेचर्स वर्षांतून 6 जंगल सफारी, 7 ते 8 ते गिर्यारोहण सहली व 2 वर्षातून एकदा केनिया सफारी आयोजित करीत असते आणि वर्षभर निसर्ग संवर्धन, प्लास्टिक कचरा मुक्ती, ध्वनी प्रदूषण, वृक्ष संवर्धन यासाठी विविध उपक्रम करीत असते. स्वतःची निसर्ग अभ्यासिका, पक्षी अभयारण्य असलेली संस्थेत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)